श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– कॉमन मॅन आणि चांद्रमोहीम… –
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
कॉमनमॅन नाचला,
आंनदाने इस्रोच्या दारी !
अभिनंदन शास्त्रज्ञांनो,
यान पोहचले चंद्रावरी !
झाला त्याला हर्ष,
आनंदाने भरून आले उर !
दूरदेशीच्या चांदोमामा,
करणार तुझ्या इथं आता टूर !
रोजच्या जगण्याच्या लढाईतून,
आज काढली त्यानं थोडीशी उसंत!
मागची पांनगळ शिशिराची होती,
आज इस्रोदारी यशाचा फुलला वसंत !
दिवस रात्र शास्त्रज्ञांनी केली,
प्रयत्नांची पराकाष्ठा अथक !
कॉमनमॅन मनी म्हणायाचा रोज,
यावेळेस तुम्हा बेस्ट ऑफ लक !
छाती फुगली अभिमानाने,
उंचावली भारताची मान!
जय जवान- जय किसान संगे,
गुंजू लागेल जय विज्ञान !
श्रेयवादाच्या लढाईत,
कॉमनमॅनला लागलय मनी वाटू !
श्रेय सारं शास्त्रज्ञांचे,
राजकारण्यानो ते तरी नका लुटू !
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈