सौ. रेखा दयानंद हिरेमठ
चित्रकाव्य
आतुरता आगमनाची…
☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆
☆
शोभसी तू बुद्धीची देवता तू दयाळा
भक्तांना दिला वाव मनाप्रमाणे मूर्ती घडवाया
बुद्धी अन् श्रध्देचा सुंदर मिलाफ होता
साजिरा-गोजिरा अवतरे घरी अन् मनी विघ्नहर्ता
☆
ज्याला जसा भावला त्याने तसा रंगविला
भक्ताघरी काही दिवस तर मनी कायमचा राहीला
अबाल-वृद्धांच्या मनी उधाण चैतन्याला
काही दिवस पारावार नाही आता आनंदाला
☆
इतकेच काय तो मंडळातही अवतरला
भक्तांसाठी तो भर रस्त्यातही उभा ठाकला
इतकीच विनंती सर्व भक्तांना जनांना
ठेवावे साजेसे वर्तन नको वाव टिकेला
तेव्हाच आनंद होईल स्वर्गी टिळकांना
☆
बाप्पा आपले अन्याय घालतो सदा पोटी
अन् दुःख ताराया येतो भक्तांच्या भेटीसाठी
आतुरता साऱ्यांनाच तव शुभ आगमनाची
आस तुझे गोजिरे रूप डोळ्यात साठवण्याची
☆
इतके मागणे हे श्रीगणेशा
आदर्श घेऊ तव गुणांचा
दे आशीर्वाद सद्वर्तनाचा
दे आशीर्वाद सद्वर्तनाचा —
मोरया
☆
😍दEurek(h)a🥰
© सौ. रेखा दयानंद हिरेमठ
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈