सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “कोण गं तू ?” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

कोण ग तू ?

आरशात बसलीस

माझ्यासारखीच

कशी दिसायला लागलीस ?

 

मी करेन

तेच कशी करतेस

मला तर अगदी 

लब्बाड वाटतेस !

 

मी बोलले तर 

फक्त ओठ हलवतेस

आवाजच ऐकू येत नाही 

असे का करतेस !

 

काय म्हणायचंय ते 

अजिबातच कळत नाही ग !

आश्चर्याने मी पाहता

तूही मग तसेच बघतेस ग !

 

मी जसे वागते 

अगदी तशीच तूही वागतेस

असं सारखं सारखंच 

का गं तू करतेस !

 

थांब जरा आता मी 

आईलाच विचारते 

बघू ती तरी तुला 

कशी ओळखते ते ?

आणि …. 

आरशातून तुला बाहेर काढून 

माझ्याशी खेळू देते का ते |

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments