सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
पाहण्यास तुम्ही या… सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
आवाहन हे ज्योतिबांना या
सावित्रीबाई सवे तुम्ही या
विद्यापीठ पाहण्यास तुम्ही या |
☆
केली तुम्ही ही ज्ञान सावली
परी प्रेमावीन सुके झावळी
नवे ज्ञान देण्यास तुम्ही या
विद्यापीठ पाहण्यास तुम्ही या |
☆
स्वप्नांस पूर्ण करण्या असे
भव्य विद्यापीठ साद घालते
मातृनाव कोरले भाळी या
विद्यापीठ पाहण्यास तुम्ही या |
☆
ज्ञानी होऊनी नारी हासती
जिद्दीने पुढे चालती
कृतज्ञतेची देतो पावती घ्या
विद्या पाहण्यास तुम्ही या |
☆
भरारी घेती कर्तृत्व पक्षी
ज्ञानवृक्ष हे तयास साक्षी
झुळूक शिक्षणाची अनुभवण्या या
विद्यापीठ पाहण्यास तुम्ही या |
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈