सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “चालत राहीन असेच आता…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
गर्द हिरवाई दोन बाजूंनी
पायाखाली आपली वाट
चालत राहीन असेच आता
जिथे घडेल त्याची गाठ ।।
☆
आयष्यातील सुखदुःखाला
सवे घेतले बांघून गाठ
तेच ओझे पाठीवर घेऊन
चालत राहीन अशीच ताठ ।।
☆
जन्मासह तो प्रगट जाहला
अंती भेटीचा क्षण ठरलेला
हिरवाई आहे भवती तोवर
भेटावा वाटे आर्त मनाला ।।
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈