श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– मुंबईची जीवनरेखा… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
पदोपदी चालतो
जगण्याचा हा संघर्ष |
धक्काबुक्की खात,
लोटती वर्षामागून वर्षं |
☆
लोकल ट्रेन सेवा,
मुंबापुरीची लाईफ लाईन |
ती आहे म्हणूनच,
कामधंदा चालतो फाईन |
☆
घड्याळाच्या काट्यावर,
मुंबई मेरी जान धावते |
लोकलची वेळ गाठायाला,
मुंबई वायू गतीने पळते |
☆
दिवसागणिक गर्दी तिच्यात,
वाढता वाढत आहे |
तुडुंब भरलेल्या डब्यात,
चाकरमानी दिवस काढत आहे |
☆
भार तिचा हलका व्हायला,
मोनो-मेट्रो जन्मल्या बहिणी |
दोघींचीही तिच्याचप्रमाणे,
होत चालली आहे कहाणी |
☆
ऑन ड्युटी RPF-स्ट्रेचर हमाल,
कोणीतरी गेला हे ऐकून कळते |
कोणा कुटुंबाचा आधार तुटला,
कुठेतरी मन त्यांच्याप्रती काकूळते |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈