श्री सुहास रघुनाथ पंडित
चित्रकाव्य
“ताई” – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
तव मायेचे छत्र मजवरी छत्रीविना तू कशी
आज अचानक येता पाऊस उगाच का भिजशी …..
☆
लहान जरी मी तुझ्याहून तरी घेईन मी काळजी
नको भिजू तू पावसात या तू तर ताई माझी …..
☆
हे ही सरतील दिवस.. आपुले येतील बघ नक्की
जरी धाकटा, होईन मोठा खूणगाठ ही पक्की…….
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈