सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “इथवर जगल्या आयुष्याचे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
चार घरच्या समवयस्क मैत्रिणी
अनुभव मोठा गाठी बांधुनी
निवांत बसुनी घर ओट्यावर
भवताल सारा घेती समजुनी
☆
इथवर जगल्या आयुष्याचे
चेहर्यावरती तेज झळकते
पचवून साऱ्या सुखदुःखाला
ताठ कण्याने निवांत बसते
☆
संस्कृतीची कास धरुनी
प्रत्येकीची वेगळी कहाणी
नऊवारी साडीतल्या मैत्रिणी
ठेवती महाराष्ट्राची शान जपोनी
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈