सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “सूर्य घेऊनी शिंगांमध्ये…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
सूर्य घेऊनी शिंगांमध्ये
नदीकाठावर उभी गाय
भुकेलेल्या वासराला
पान्हा सोडीतसे माय
*
बंधनरूपी गळ्यात अडणा
स्त्रीत्व म्हणूनी का या खुणा?
ताबा मिळणे सोपे जावया
अडण्याचा हा असे बहाणा !
*
कुठेही जावो चरावयाशी
सांजवेळी परतते घराशी
दुध दुभत्याची रेलचेलही
गोधन असता नित हाताशी
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈