श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– अध्यात्माचे शाश्वत धन ! – ☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
शेगाव ग्रामे ,
प्रकट झाले श्री गजानन !
अवलिया असा,
अध्यात्माचे शाश्वत धन !
*
उष्ट्या पत्रावळी ,
आनंदे अन्न सेवन !
योगियाचे झाले ,
जगा प्रथम दर्शन !
*
गजानन महाराजांनी ,
केल्या लीला अगाध !
धावून भक्तांच्या हाकेला,
कृपेचा दिला प्रसाद !
*
झुणका भाकरी नैवैद्य,
महाराजांना तो प्रिय !
चिलीम घेतली हाती,
भाव भक्ताचा वंदनीय!
*
गण गण गणात बोते,
ध्यान मंत्र मुखी सदा!
सरतील संसारी दु:खे,
टळतील सर्व आपदा!
*
शेगावी दर्शना जावे,
करावे तेथे पारायण!
एक चित्ती ध्यान करावे,
प्रसन्न होईल नारायण!
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈