सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “स्वप्नातले घर…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
अशी असावी खोली माझी
पुस्तक भरल्या भिंतीची
नजरेपुढती शब्द खजिना
विट न दिसावी मातीची
*
विशाल नभ अथांग सागर
गवाक्षातून दिसो निरंतर
हिरवेगार झाड देईल
झुळूक मधूनच स्फूर्ती जागर
*
स्वप्नातील घर अनुभवास्तव
बिछायतही मृदू मुलायम
लिखाणाची जुळणी कराया
असेच असावे सारे सक्षम
*
लिहा वाचण्यासाठी सांगा
स्वर्गी असेल का अशी जागा
शांत निरामयता मिळवाया
हीच अशीच ,हवी मज जागा
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈