सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “फुले बकुळीची– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

कळीच्या रूपाने मुग्ध बाल्य

पुर्ण फुललेल गंधीत तारुण्य 

सृष्टीचक्र हे स्वीकारले तर

सुकल्या  फुलाचे  निर्माल्य ….. 

*

नक्षीदार  हे दोन करंडे

सुगंधाने पूर्ण भरलेले

स्वर्गामघूनी भगवंताने

वसुंधरेस  पाठविलेले ….. 

*

तया संगती मुग्ध कलिका

हात धरूनी खाली आली

रूप उद्याचे आज न्याहळी  

आपसूक लाली येई गाली ….. 

*

 पलीकडचे फुल सुकलेले

 पाहून बकुळ नाही ढळले

 जीवनातील सत्य स्वीकारत

  जगणे इवले तयास कळले ….. 

*

बकुळ म्हणे सुकले तरी मी

इथेच असेन सुगंध रूपाने

कवी लेखक जसे वावरती

अक्षरातुन  साहित्यरुपाने ….. 

*

 माघ्यम कुठलीही भाषा 

जगातील कुठलाही देश

क्षर ना जयाला ते अक्षर

चिरंतन असो वेगळा वेष ….. 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments