श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– आभाळमाया – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

रखरखते ऊन,

पिलांवर आईची सावली |

स्वतः झळा सोसून,

पिलांचे रक्षण करते माऊली |

*

आई ती आईच असते,

अगणित सोसते कळा |

तक्रार तिच्या अंगी नसते,

मातृत्वाचा जपते लळा |

*

दाही दिशा करते,

चारापाण्यासाठी वणवण |

चोचित साठवते दाणा,

उदरी करत नाही भक्षण |

*

उंच उंच झेप घेते,

जिद्द करते आकाशाशी |

कुठेही असली जगी,

चित्त तिचे पिलांपाशी |

*

स्वर्ग ही ठेंगणा वाटावा,

इतकी आईची आभाळमाया |

जीवात जीव असेपर्यंत,

पिलांसाठी झिजवते काया |

*

आईची थोरवी सांगताना,

शब्दच  पडतात अपुरे |

वासल्य सिंधू, प्रेम स्वरूप,

आईविना जीवन अधुरे |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments