सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ आई झाली स्वतः च नाव…
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
पैलतीरावर जाण्यासाठी
आई झाली स्वतः च नाव
आजुबाजुला अथांग पाणी
दूर तिथे वसतिचा गाव
☆
पोटची पिले पाठीवरती
मदार वल्हे पायावरती
मातेवरच्या विश्वासावर
पिल्ले निवांत पाठीवरती
☆
पक्षांमधला क्षण हा सुंदर
मात्रुभावनेचा जागर
जलाशयातील प्रतिबिंबाने
सौंदर्याची चढवी झालर
☆
🦆दिवसभराच्या शुभेच्छा🦜
चित्र साभार – सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈