सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
बोट चार पाकळ्यांची… सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
चार मित्रांमध्ये अहमहमिका अशी लागली
बोट चार पाकळ्यांची जागी थांबली ||
*
सहकार गाव होतं, त्यात चार दोस्त
सुख – दु:ख समान त्यांचे रहात होते मस्त
चार दिशांची आमिशे कोणी दावली
बोट चार पाकळ्यांची जागी थांबली ||
*
चार दिशेला तोंडे परी, एका थाळीत जेवत होते
एकजूट होऊन संकटा ध्वस्त ते करत होते
सत्ता मोहाने डोकी अशी का फिरली
बोट चार पाकळ्यांची जागी थांबली ||
*
प्रकृतीच्या एका प्रवाही चौघांची ही नाव
विरुद्ध दिशेला नेण्या जो तो खेळे डाव
मला नाही तर तुलाही नाही, मती भ्रष्ट कशी जाहली
बोट चार पाकळ्यांची जागी थांबली ||
*
कुठे गेली एकता अन कुठे समानता
सोप्या गोष्टी अवघड झाल्या नुरली सहजता
तुला नाही मला नाही, नाव भोवऱ्यात बुडली
अशी देशाची आपल्या स्थिती असे जाहली ||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈