सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ फॉरवर्ड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
चौकटीतले चित्र फुलांचे
फाॅरवर्ड जिथे तिथेच नाचे
गुड मॉर्निंग सुप्रभात छापील
तेही कष्ट न हो, लिहायचे
*
चित्रामधला आशय सहसा
पाठवणारा पहात नाही
फाॅरवर्ड करणाराही देतो
त्या वृत्तीची आपसूक ग्वाही
*
कशास हा व्यापार करावा !
आपुलकीचा शब्द लिहावा
केले म्हणूनी नको कराया
स्नेहभारला तो दुवा असावा !
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈