सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
कोण असे हा ? सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
डोंगरावर कोण साधू
ध्यान लावून बसला
चैतन्याची आभा पसरे
चराचर जागला ||
*
का असे हा कोणी वैद्य
दुरून रेकी देणारा
वठलेले तरु पण तरारती
प्राण तयात फुंकणारा ||
*
आहे का ही शक्तिदा
शक्ती स्रोत वाहणारी
ममतेचे हस्त ठेऊन शिरी
अपत्यांना जागवणारी ||
*
कोण आहे माहित नाही
युगानुयुगे कर्म आपले करत राही
दर्शन याचे उठल्या बरोबर
आरोग्यदान पदरात येई ||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈