श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – जिवलग मित्र सारे – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

 जन्माला जरी  आलो एकटा,

मित्रांनी नाही जाणवून दिले एकटेपण!

अनेक सुख दुःख आली,

हाक न मारता  धावून आले सारेजण!

*

बालवाडी खेळी एकत्र दमलो,

तारुण्यात मौजमस्तीत रमलो!

तिसरा अंक येईल तेव्हा येईल,

वर्तमानात एकमेकांसाठी जमलो!

*

कधी जरी उदास वाटे  मनाला,

डोळे पाहून मनातले सारे वाचतात!

कष्ट करून यश मिळते तेव्हा,

माझ्यापेक्षा तेच  आनंदाने नाचतात!

*

आर्थिक प्रगती पुढे मागे असे,

तुलना सुखाची कुणा अंतरी नसे!

एकाच कट्ट्यावर एकत्र सारे बसे,

निखळ मैत्रीचा भाव ह्रदयात वसे!

*

आयुष्यभर साथ दिलीत,

भावनांचा  केला नाही कधी धंदा!

अमरपट्टा नाही घेऊन आलो,

जाईन तेव्हा मित्रांचाच मिळू दे खांदा!

 

© श्री आशिष  बिवलकर

दि. 07 ऑगस्ट 2024

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments