श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कोवळ्या कळ्यांना कसे समजावे ???? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

कोवळ्या कळ्यांना कसे समजणार,

गुड टच बॅड टच कशाला ते म्हणतात |

विकृत मनोवृत्तीची शिकार होऊन,

क्रूर हैवानी वासनेला बळी पडतात |

*

वरकरणी माणसाच्या चेहऱ्याआड,

वासनाधुंद नराधम लपलेला असतो |

बिचारा गरजू आहे हेच समजून,

नकळत आपणच नको तिथे फसतो |

*

सरस्वती मंदिरात पाल्यास पाठवतांना,

पालकांच्या मनी असतो दृढ विश्वास |

सुरक्षित वातावरणात विद्यार्जन चालेल,

होणार नाही बालकास कुठला त्रास |

*

एक अशुभ दिवस उजाडतो, ,

माणसातला हैवान साधतो त्याचा डाव |

कोवळ्या जीवास असंख्य वेदना,

आयुष्यभरासाठी जिव्हारी बसतो घाव |

*

काय घडलंय तिच्या बाबतीत,

सांगायचे तिलाच माहित नसते |

सुसुच्या जागी खूप दुखतय,

इतकंच पालकांना दाखवत असते |

*

चिंताग्रस्त पालक तिला घेऊन,

डॉक्टर काकांकडे जातात |

प्रकार सारा लक्षात येताच,

मुळापासून पुरते हादरतात |

*

फिर्याद करायला आई मुलगी,

सरळ पोलीस स्टेशन गाठतात |

पोलीस बारा तास तिष्ठत ठेवत,

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात |

*

भ्रष्ट आणि असंवेदनशील अधिकारी,

तक्रार नोंदवायाला करते टाळाटाळ |

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता,

पेट घेते जनआक्रोशाचे आभाळ |

*

व्यवस्थेने दाबलेल्या एका ठिणगीचा,

रान पेटवणारा होतो तिचा वणवा |

जनतेच्या आंदोलनाची धग बसताच,

षंढ प्रशासनाला दिसतात उणीवा |

*

भडकते आंदोलन, पेटत सारं रान,

मुंबईच्या लाईफ लाईनला बसतो ब्रेक |

बडे अधिकारी, मंत्री, संत्री, कुत्री,

समजूत काढायला आले एकामागून एक |

*

नेतृत्वहीन आंदोलन आवरायाला,

पोलीस बळाचा झाला वापर |

न्यायाच्या मागणीसाठी झालेल्या,

जनआंदोलनावर फुटले खापर |

*

साठ वर्ष ज्ञानाची सावली धरणाऱ्या,

वट वृक्षावर अचानक वीज पडते |

इतक्या वर्षांच्या कडक तपश्चर्येला,

कुठेतरी गालबोट मात्र नक्कीच लागते |

*

जनआंदोलनाच्या तापलेल्या तव्यावर,

राजकारणी आपली पोळी भाजत आहे |

सुसंस्कृत ऐतिहासिक शहराला काळिमा 

लागला म्हणून बदलापूरकर लाजत आहे |

*

वासनाधुंद हैवानाच्या पापाची शिक्षा,

सर्वसामान्य नागरिक भोगत आहे |

कूर्मगतीने चालणाऱ्या व्यवस्थेकडे,

चिमुरडीसाठी जलद न्याय मागत आहे |

 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments