सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? माझ्या गाईच हे गोरंसौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

माझ्या गाईच हे गोरं

दिसामासांनी वाढलं

खोंड देखणं झालेल

नांगराला मी जुंपलं

*

हत्तीवाणी रूप त्याचं

कामाचा उरक भारी

वसवंडीचा उंचवटा

शिंगं देखणीच न्यारी

*

झुलं मानाची घालून

बैलपोळे सजवले

वेशीतून मिरवत

केले देखणे सोहळे

*

आता पिकलं हे पान

चंगाळ्याच नाही गाणं 

जिवाभावाचं हे सोनं

माझ्या रानाची ही शानं

*

दात पडलेत त्याचे

देतो कुटलेला चारा

हिरव्याशा गवताचा

माऊ बसण्या निवारा

*

मुक्या जीवाच्या भावना

डोळ्यातून अश्रू गाळी

माझ्या लाडक्या नंदीचा

प्रेम भाव मी न्यहाळी

*

सेवा करून मी त्याची

फेडतोय आज ऋण

त्याच्या थकल्या जीवाला

विश्रांतीचे काही क्षण

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments