चित्रकाव्य
नमोस्तु दुर्गे – चित्र एक काव्ये दोन ☆ श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री नीलांबरी शिर्के ☆
श्री प्रमोद वामन वर्तक
( १ )
नारी शक्ती असते भारी
देई प्रत्यय प्रसंगोत्पात,
तूच मायेचा असशी झरा
किमया दाविसी विश्वात !
*
होम करुनी अष्टमीला
तुझे स्तवन करती भक्त,
रात जगवूनी सारेजण
खेळती दांडिया मनसोक्त !
*
कधी होऊनि रणचंडीका
करशी पाडाव दैत्याचा,
येता कोणी शरण तुजला
करशी उद्धार त्याचा !
*
नऊ दिसाचे नऊ रंग
शोभून दिसती तनुवरी,
तूच एक जगन्माता
साऱ्या विश्वाची संसारी !
*
अष्टभुजांनी सांभाळशी
सकल विश्वाचा पसारा,
नमन करुनी आदिमायेस
करू साजरा दशमीला दसरा !
करू साजरा दशमीला दसरा !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
☆☆☆☆
सुश्री नीलांबरी शिर्के
( २ )
नऊ दिवस अन नऊ रात्री
जागर सुरू देवी भक्तिचा
स्त्री रूपातील नवदुर्गेचा
जागर हा नारी शक्तिचा
*
प्रसन्न सात्विक रूप देवीचे
नीत्य भजे जग त्या रूपाला
प्रसंग येता जग संहारक
खड;ग शस्त्र धारण करूनी
प्रकट करी ती शक्तिरूपाला
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈