☆ स्वप्न… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
☆
राबराबतो धनी माझा
काळ्या आईची करी चाकरी
*
मृग नक्षत्र बरसून जाई
पीक कसे ते तरारून येई
*
अंगावरची कापडं विरली
तरी त्याची पर्वा नाही
*
एक सपान डोळ्यात राही
गरिबी माझी संपेल आतातरी
*
भाव देईल का सरकार यंदा
कष्टाचे मग सार्थक होण्या .. .. ..
☆
© सुश्री त्रिशला शहा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈