सुश्री नीलांबरी शिर्के
☆ धन्य तू गं बहिणाई ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
निरक्षर तुज कसे म्हणावे
शब्द खजिना तुजपाशी
सरस्वतीचा हात शिरावर
चराचराशी संवाद साधशी …..
*
चुलीवरचा तवा सांगतो
तुजला जीवन तत्वज्ञान
सुगरणीचा खोपा बोलतो
तुला ग सामाजिक ते भान ……
*
कपाळ पडले उघडे पण
सृजनतेने शेतात कष्टता
सोने पिकवीत तू राबता
सहजतेने सुचल्या कविता ……
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈