श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार-विरोधी दिन… श्री आशिष बिवलकर ☆
☆
कर्तव्याचा लिलाव,
बिनधास्त चाले |
देण्याघेण्याचे काय
सर्रासच बोले |
*
वाळवी पोखरत,
जाते सर्व काही |
अंतरात्मा कुणाचा,
जिवंत न राही |
*
बुडापासून शेंड्यापर्यंत,
लागलीय ही कीड |
यंत्रणा झाली सर्व भ्रष्ट,
चेपलीय साऱ्यांची भीड |
*
पकडला जो जाई,
त्यास म्हणते जग चोर |
पण तो सही सलामत सुटे,
कायद्यातल्या पळवाटा थोर |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈