?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – उंबरा… –  ? ☆ सुश्री हेमा फाटक 

उंबर्‍याशी विसावलं

घाई नाही कसलीही

म्हातारपण द्वाड बाई

सय नाही सुटलेली—- 

घर खाया उठलेलं

सारं कसं चिडीचूप

दिसागणिक वाढते

लेकरांची याद खूप—-

भरलेला होता वाडा

ओसरीला आला-गेला

पायताणांचा राबता

सडा पडे गर्द ओला—-

लेकरांनी माजघर

तिथं कालवा केवढा

रडे हट्ट हाणामारी

शांत रातीस तेवढा—-

पाखरा इवं सारी पोरे

शिकूनिया दूर गेली

विसरोनी गांव खेडी

शहराची वासी झाली—-

धनी काळवासी झाले

आता कोठला दरारा

म्हातारीच्या डोईवर

उभा रिता हा पसारा—-

फक्त उन्हाळ्याची सुट्टी

घालवण्या पोरे येती

म्हातारीच्या सोबतीला

फक्त मोकळ्याच राती—-

रस्त्यावर वाटसरू

येतां जातां ख्याल पुसें

अवचित बोला साठी

माय उंबर्‍याला बसे—–

माय उंबर्‍याला बसे !!—-

चित्र साभार – सुश्री हेमा फाटक

© सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments