सुश्री ज्योत्स्ना तानवडे
चित्रकाव्य
– हळवे स्मृतीचित्र – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
हिरवा निसर्ग सभोवताली
उंच झेपावणारी गर्द झाडी
त्यात वसलेली आजोळाची
सुबक ठेंगणी माझी वाडी ||
*
सारवलेले स्वच्छ अंगण
त्यात देखणे तुळशी वृंदावन
बागेमधली फुले मनोहर
घालती सुगंधी संमोहन ||
*
अंगणातल्या उनसावल्या
भुरळ घालती मनाला
बालपणीचा खेळ रंगला
आठवतो याही क्षणाला ||
*
शुभ्र गोबरी मनी माऊ
पायांमध्ये घोटाळत राही
सागरगोटे काचाकवड्या
ओसरी सदा निनादत राही ||
*
गाण्यांमध्ये रमून जाई
चित्रामधुनी जुन्या स्मृतींना
पुन्हा नव्याने जगून घेई ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈