सुश्री ज्योत्स्ना तानवडे
चित्रकाव्य
– अदलाबदल – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
आई मूल नाते गोड
माय जगे बाळासाठी
साऱ्या विश्वाच्या सौख्याला
बांधी त्याच्या मनगटी ||
*
ठेच लागता बाळास
कळ माऊलीच्या उरी
नाही आईच्या मायेस
कशाचीही बरोबरी ||
*
तिचा काळीज तुकडा
येई ग नावारूपाला
लेक कर्तृत्वसंपन्न
नेई जपून आईला ||
*
आई मुलाच्या नात्याची
अदलाबदल होते
एका पिढीचे असे हे
आवर्तन पूर्ण होते ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈