सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
आई बाबा जेव्हा गेले
चार भावंडेच उरले
चार वर्षाची मुक्ताई
तीन मोठे भाऊ राहिले—–
☆
सहा वर्षाचा सोपाना
आठ नऊचा होता ज्ञाना
निवृत्तीदादा मोठा होता
केवळ अकरा बाराचा—–
☆
कोरान्नाची भिक्षा मागती
नेहमी निवृत्ती अन ज्ञाना
छोट्या मुक्ताईला सांभाळी
मोठा होऊनी सोपाना—–
☆
हीच छोटी मुक्ताबाई
झाली सर्वांची ताई
कोंडुन बसल्या ज्ञानासाठी
विनवित ताटीचे अभंग गाई—–
☆
गोऱ्या कुंभाराचे मडके
कच्चे तिनेच दाखवले
वडील आणि गुरूस्थानी
निवृत्ती नाथा पूजियले—–
☆
मुक्ताबाई श्रेष्ठ योगिनी
निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर
बळ देऊनी वारकरी पंथा
अठराव्यात होई समाधिस्थ—-
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈