श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? झालो मी घायाळ… ? श्री आशिष  बिवलकर ☆

घायाळ केलंस सखे,

नयन तुझे तलवार!

हृदयाला भिडलीस,

केलेस जुलमी वार!

*
कुंतल तुझे

रेशमी जाल!

गोरे गोरे

मऊ मऊ गाल!

*
किती सुंदर अशी,

बहारदार तू हसते!

हास्यात तुझ्या

शरद पौर्णिमा भासते!

*
सौंदर्यात तुझ्या,

पुरता मी बुडालो!

प्रेमात तुझ्या,

पार वेडावलो!

*
एकटक तुला,

पहावयास वाटे!

ह्रदयात तुझ्या,

पत्ता माझा भेटे!

*
तुला पहात पहात लिहावी 

कविता की गझल!

अप्सरा जरी अवतरली,

तुझ्या पुढे काय तिची मजल!

*
तुझ्या वर्णनात

शब्द सुंदर होतात!

शृंगार रसात

कवितेत सजतात!

*
तुझ्या नावाने अखंडित,

श्वासांची गुंफलीय माळ!

मृत्यू जरी आला तरी,

थांबेल तो ही सर्वकाळ!

*

स्तुतीने सुखवलीस तू,

हरवून गेलीस काही काळ!

एव्हढ्या शिट्या दिल्यात मी,

शिजली का ग माझी डाळ! 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments