सुश्री नीलांबरी शिर्के
☆ कष्टाचा सुगंध… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
जिथवर हात पोहोचतो
तिथवर रचून थरावर थर
दिवसभर तो ओझे वहातो
त्यावर चालतं त्याचं घर
*
कष्टाने घाम फुटतो
अन् वहातो तो देहावर
त्याच घामावर कमावतो
घरच्यांसाठी अन्न घासभर
*
घासभर त्या परब्रह्माला
कष्टाचाच सुगंध असेल
त्या सुगंधाच्या शोधासाठी
उद्या तो कामावर हजर असेल
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈