सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
सोनसळी खेळ
सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
सुवर्ण बिंबाचा दिसताच
मोह पडे सकल विश्वाला
सुवर्ण उधळी माथ्यावर
पाखरे करूनी गलबला॥
*
परीस आहे का हा अरुण
शंका येतसे भाबडी भोळी
परीस परीसाच्या जादूई
स्पर्शे परिसर सोनसळी॥
*
मल्हार आळवत सकल
आसमंत पहा भारावले
मल्हार प्रसिदण्या का कोणी
बेल भंडार हे उधळले॥
*
पितांबर नेसे नारायण
अर्घ्य अवनीचे स्विकारण्या
पिता अंबर माता धरती
हस्तांदोलनी ये पक्षी गाण्या॥
*
खेळ कोणता खेळते सृष्टी
अंदाज नाही येत सांगता
खेळ मना कल्पना विलासी
सुरुवातीस या ना सांगता॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈