सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– हर घर तिरंगा – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
हर घर तिरंगा
केवढी संधी
केवढा मान
मोठीच शान —
☆
खोचला पदर
कसली कंबर
कासोटा घट्ट
मनात आदर —
☆
मजबूत हात
भक्कम साथ
वर मान ताठ
ध्वजाला हात —
☆
अशा हातांनी
ध्वजारोहण
अमृतमहोत्सव
रास्त कारण —
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈