सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
– 🇮🇳 अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा 🇮🇳 – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☆
अमृत महोत्सव सोहळा स्वातंत्र्याचा
राष्ट्रध्वजाचे जाहले आरोहण
आदराने गाऊ राष्ट्रगीताचे गायन
स्मरुनी वीरांनी अर्पियले स्वःप्राण..
☆
आकाशात लहरतो तिरंगा
देशाचा असे गर्व अन शान
देशधर्म निभावूनी चालू सारे
व्यर्थ न व्हावे त्यांचे बलिदान..
☆
घेरले कितीदा देशास आपुल्या
अघोर आपदा,बेबंध संकटांनी
लावियले प्राण पणास वीरांनी
बाजी शर्थ अन हिम्मत दावूनी..
☆
पंच्याहत्तर वर्षांचा काळ लोटला
स्वातंत्र्य मिळूनी भारताला
उगा जात धर्म भेद लोढण्याने
नका गमवू हो स्वारस्याला..
☆
उत्साहात उत्सवाप्रती साजरा
असे देशाचा हा मंगलदिन
आठवूनी देशभक्तांचे समर्पण
तिरंग्यास करूया सादर वंदन..!
☆
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
ठाणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈