सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– किती दिवस श्रावण आहे? – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
श्रावण महिना संपायला
का लागतोय उशिर
किती दिवस राहीलेत बघतो
मनपसंत खायला उंदीर
☆
सुरवाती बर वाटल
जिभेने लपलप दुध प्यायला
कधी कधी चपातीही मिळे
कुसकरून मस्त खायला
☆
पण आता नको वाटत तेच
तोंडाचीच गेलीय चव
किती दिवस श्रावण आहे
म्हटल कॅलेंडर तरी पहाव
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈