श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
☆ रंगांची उधळण! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
सांजवेळी नभांगणी
होई रंगांची उधळण,
पाहून मज प्रश्न पडे
रंग त्यात भरी कोण ?
☆
बघून स्वर्गीय नजारा
गुंग होऊन जाई मती,
नाना रंगांची वेशभूषा
वाटे मग ल्याली धरती !
☆
पाहून न्यारी रंगसंगती
मन मोहरून जाई,
कुठला त्याचा कुंचला,
कुठली असेल शाई ?
☆
अदृश्य अशा त्या हाती
असावा अनोखा कुंचला,
आपण फक्त हात जोडावे
त्या वरच्या रंगाऱ्याला !
☆
फोटोग्राफर – अस्मादिक
© प्रमोद वामन वर्तक
२५-११-२०२२
स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.
मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈