सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– फांदीवरती बसला पक्षी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
1
फांदीवरती येऊन बसला
इवला वेडाराघू पक्षी
कोवळ्या पानाने रेखली
नाजूक सुंदर नक्षी
☆
अंगावरची नक्षी पाहून
राघू मनात सुखावला
मिरवत नक्षी इवला पक्षी
काही वेळ तिथे स्थिरावला
2
पिवळ्या पिसांचा
ताज शिरावर
हिरवाई लेऊन
इवल्या अंगावर
☆
क्षणभर विसावे
राघू फांदीवर
आपसूक उमटे
नक्षी अंगभर
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈