सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– मातृत्व – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
गाय जेंव्हा माय होते
कासेला वासरू लुचते
त्या ओठांच्या स्पर्शाने
ती आपसूक पान्हावते
☆
मातृत्वाचा शिरी तूरा
मुखी पडती अमृत धारा
ढूशा देऊनी पिते वासरू
जिव्हास्पर्शी स्नेह झरा
☆
आई भोवती जग बाळाचे
बाळासाठी जगणे आईचे
पशुपक्षी कटक वा मानव
बदलून जाते विश्व बाईचे
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
29/12/22
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈