सुश्री ज्योत्स्ना तानवडे
चित्रकाव्य
– शाम मोहिनी – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
कुंजवनात कदंबाला
झोका सुरेख झुलतसे
राधामोहन भावमग्न
देखणे चित्र शोभतसे ||
☆
झुल्यावरती कान्हासंगे
झुलते तल्लीन होऊनी
सावळ्यात सामावताना
घेतले नयन मिटुनी ||
☆
लोकलज्जा तुटले बंध
कृष्णप्रीती जडली बाधा
सर्वस्वाने एकरूपता
विसरली ‘मी’ पण राधा ||
☆
कृष्णमय होऊनी राधा
भान विसरुनी जगते
पूर्वजन्मीच्या पुण्याइने
अद्वैत प्रीतीत रमते ||
☆
चित्र साभार – सौ.ज्योत्स्ना तानवडे
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈