सौ. वंदना अशोक हुळबत्ते
चित्रकाव्य
– कविता स्मरण… – कवी बा. भ. बोरकर ☆ प्रस्तुती – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
☆
स्मरते कधी भरली नदी
अन गर्द झाडी काठची
पावसाळी चांदणे
अन साऊली घनदाटशी
हिरवे दिवेसे काजवे
मरवा हवेचा तीक्ष्णसा
दूर कोण्या पाखरांचा सूर जख्मी क्षीणसा
तो धुराने फासलेला, झोपड्यांचा पुंजका
गोठलेले ते धुके – छे! कोंडलेला हुंदका…..
कवी – बा. भ. बोरकर
प्रस्तुती – सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈