सौ. वृंदा गंभीर
जीवनरंग
☆ माझा मित्र… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
” माझा मित्र आणि मी एकाच दिवशी जन्मलो, बारसं एकत्र झालं, एकत्र वाढलो बरोबर शिकलो.
” जय, विजय, नावं ठेवली. आमच्या दोघांच्या आई मैत्रिणी त्यामुळे सगळं सारखं मिळत गेलं.
” दोघांचे पप्पा पोलीस अधिकारी. बदल्या होत होत्या सारख्या म्हणून आम्हाला एकत्र फ्लॅट घेऊन ठेवलं आणि नोकर ठेवले आमचं बघायला. ”
” जय अतिशय हुशार त्याच्या मनाने मी थोडा कमी पण त्याने कधी तसं दाखवलं नाही मला बरोबरीने आणण्याचा प्रयत्न केला.
” बारावी झाली दोघांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला, आणि M. B. B. S. साठी नंबर नागपूरला लागला…..
“कॉलेज सुरु झालं अभ्यास वाढत होता दोघेही मन लावून अभ्यास करत होतो आणि प्रगती तशीच होती….
एका मागून एक वर्ष संपले आम्ही डॉक्टर झालो, पुढे शिकण्यासाठी परदेशी गेलो निरोलॉजिष्ट मेंदूविकार तज्ञ म्हणून भारतात आलो……
” पप्पांची गाडी यायला उशीर होता म्हणून आम्ही विमानतळावर वाट बघत बसलो……
” लांब एक गरीब मुलगी उभी होती, तिला बघून वाईट वाटलं मी तिच्याकडे बघत होतो तेवढ्यात ती खाली पडली….. मी पळालो तिला पाणी देऊन शुद्धीत आणलं जवळच हॉस्पिटल बघून तिला तिथे घेऊन गेलो.
” तीच चेकप झालं तिच्या मेंदूत गाठी होत्या, ती म्हणाली डॉक्टर मला जाऊद्या मी गरीब आहे आई वडील मोलमजुरी करून पोट भरतात आम्ही पैसे नाही देऊ शकत..
” विजय म्हणाला आपण उपचार करू हिच्यावर, उपचार सुरु झाले तिच्या घरी कळवलं ती गावाकडून काम शोधायला शहरात आली होती.
“आई वडील घाबरले काय झालं मुलीला म्हणून रडायला लागले. मी त्यांना सांगितलं घाबरू नका ती ठीक होईल…..
” रूपा तीच नावं नावासारखीच रुपवान आणि गुणी मुलगी, , , , ,
रूपा हळू हळू बरी झाली, आम्ही तिला ऍडमिट करून घरी गेलो मोठ्या उत्साहात स्वागत झालं, का वेळ लागला म्हणून विचारलं घरी सगळी हकीकत सांगितली आणि घरचे खुश झाले.
” रूपा घरी जाणार त्या दिवशी तिचे आई वडील पाया पडायला लागले.
” मी म्हणालो काका पाया पडू नका मी माझं कर्तव्य केलं मी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेणार आहे तुम्हाला काही गरज पडली तर येत जा…..
” काका म्हणाले डॉक्टर साहेब आम्ही खेड्यातले लोक आमच्या गावात आसपास डॉक्टर नाही आम्ही झाडापाल्यावर औषधं करतो, , , , , मला ऐकून वाईट वाटलं.
मी मनात ठरवलं एकदा त्यांच्या गावी जायचं मी जय ला बोललो आणि जय म्हणाला आपण आत्ताच जाऊ त्यांना आपल्या गाडीत घेऊन जाऊ तो हो म्हणाला आणि आम्ही निघालो.
” रूपाच गावं आलं, गावं निसररम्य होतं स्वच्छ हवा होती पण सोय काहीच नव्हती.
“गावं बघितलं त्यांना सोडून आम्ही घरी आलो पप्पा म्हणाले आमचं बोलणं झालं तुम्हाला दोघांना हॉस्पिटल टाकून द्यायचं, जागा बघून ठवली आहे तुम्ही बघून घ्या कामाला सुरवात करू.
” माझं मन लागत नव्हतं मी विचार करून सांगतो म्हणालो जय आणि मी बाहेर निघून गेलो.
” आम्ही दोघांनी ठरवलं रूपा च्या गावी सेवा द्यायची आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा.
“घरी आलो पप्पांना निर्णय सांगितला त्यांना तो आवडला परवां गी दिली.
” आम्ही गावी आलो दवाखाना चालू केला लोकांना आधार वाटला….
” हॉस्पिटल चं काम चालू केलं जवळ पास च्या गावातील लोक उपचारासाठी येऊ लागले.
सगळ्यांनी श्रमदान करून हॉस्पिटल उभारलं गावाला नवीन ओळख मिळाली.
” रूपा हुशार होती म्हणून हॉस्पिटल मध्ये नोकरी दिली तसच नर्सिंग शिक्षण चालू केलं……
तिचे बाबा माळी म्हणून काम बघू लागले तर आई स्वयंपाक करत होती.
” गावाचे दिवस पालटले तसे रूपाच्या कुटुंबाचे दिवस पालटले.
” आमच्या मैत्रिणी गावं बघायला आल्या आणि गावाच्या आणि आमच्या प्रेमात पडल्या तिथे राहिल्या
आता सगळ्यांच्या साथीने शहरातील रुग्ण तिथे येत होते आणि आम्ही सेवा देत होतो.
” आमचं लग्न झालं दोघांचा सुखी संसार सुरु झाला. गावाच्या मोकळ्या हवेत सुंदर आयुष्य जगत होतो.
एक दिवस निवांत बसल्यावर जय म्हणाला आपला निर्णय योग्य ठरला….
गावचं सुख बघून मन भरून येत होतं.
आणि गावातील लोक आदर सन्मान देत होते जो शहरात कधीच मिळाला नसता.
आज गांधीजींचे वाक्य आठवते – – –
“चला पुन्हा खेड्याकडे “
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈