सौ.अंजली दिलिप गोखले
☆ जीवनरंग ☆ गोपी – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
आमचा प्रवास सुरू होता. बाहेर घाटातून वळण घेत आमची टॅक्सी धावत होती. माझे मन सुद्धा कासावीस होऊन हेलकावे खात होते. या चिमुरड्याला काय वाटत असेल? “गोपी, भूक लागली का? बिस्किट खाणार की कुरमुरे खाणार?” संभाषण कसं वाढवायचं तेच मला समजत नव्हतं.
“नाही ग आत्या, भूक नाहीये. मला ना, आमच्या तिथल्या छोट्या मांजराच्या पिला ची आठवण येते ग. तिकडे ना, दुपारी मी आणि तेच असायचो. त्याची आई त्याला सोडून गेली होती. मीच त्याला बशीतून दूध पाजत होतो. आता मी तर इकडे आलो. त्याला आता कोण दूध देणार?” माझा हात घट्ट दाबत गोपी मला विचारत होता.
त्याचे ते निरागस, प्रेमाचे बोल ऐकून मला भडभडून आलं. त्या पिल्लाची आणि गोपी ची अवस्था एकच होती.पण त्या पिलाची काळजी त्याला पोखरून टाकत होती. पिल्ला च्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. आपल्या पप्पां वरच्या गाढ विश्वासाने गोपी माझ्याबरोबर आला होता. त्याला खात्री होती, आपण आता सुखरूप आहोत. आजी-आजोबा आपली वाट पाहत आहेत. त्यांना भेटायला त्याचे मन अतुर झाले होते. तेवढेच पिल्लाच्या आठवणीने त्याचे मन कातर ही होत होते.
खरच, ही साधी जाणीव मोठ्यांमध्ये का बरे नसावी? तू तू, मै मै च्या जमान्यात प्रेम, आपुलकी, ओढ, मायेचा ओलावा कसा मिळवायचा या फांदीवरून कोसळणार्या नाजूक फुलांनी?
क्रमशः —-
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈