श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-3 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
विश्वासराव एक यशस्वी उद्योजक होते. त्यांचा बिल्डणली. रक्ताची सोय केली. व दिपकच्या शाळेत त्याच्या शिक्षकांना त्याच्या आजाराची व ऑपरेशनची सर्व माहिती सांगितली. गैरहजेरीचा एक महीन्याचा अर्ज लिहून दिला. मग त्यांनी दिपकला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सकाळी७वाजता दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉ. सानेंनी दिपकला ऑपरेशनची सर्व कल्पना दिली. मगच ते तयारीला लागले.ऑपरेशन करणार हे ऐकून दिपकही थोडा घाबरला. पण आईशी बोलल्यावर तो शांत झाला. विश्वासराव ९.३० वाजता दवाखान्यात आले. ते डॉ. सानेंना जाऊन भेटले. तेथे डॉ. वझे. व डॉ. सतीश देवही हजर होते. त्या सर्वांशी विश्वासरावांच बोलणं झालं. औषधे यादीप्रमाणे आहेत की नाही ते पाहीले. लगेचच लागणारी औषधे काढून घेतली व बाकीची विश्वासरावांना परत दिली. तेवढ्यात भूल देणारे डॉ. कोदेही आले. दिपकला १०.३० लाऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.
बाहेर नमिताचा व इतर सर्वांचा सारखा ‘ओम नमःशिवाय’ चा जप सुरू होता. नमिता मनातून थोडी घाबरली होती. पण ती तशी खंबीर होती. तब्बल तीन तासांनी ऑपरेशन संपले. डॉ. वझेंनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले. थोड्या वेळाने डॉ. साने, व डॉ. देव ही बाहेर आले. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले. एक काळजी थोडी कमी झाली.
अर्ध्या तासाने दिपकला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणले. ऑपरेशनच्यावेळी त्याला रक्त व सलाईन चालू होते. सलाईन नंतरही चालूच होते. त्याला शुद्धीवर यायला बराच वेळ लागणार होता. कारण ऑपरेशन तसं मेजर व त्यात रिस्कही खूप होती. गाठीचा रिपोर्ट आल्याशिवाय पुढील औषधोपचार करता येणार नव्हते. दिपकला आय.सी.यू. मधेच ठेवण्यात आले.
क्रमशः….
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈