श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-5 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
दर पंधरा दिवसांनी डॉक्टर त्याचे चेकिंग करत होते. त्याचा आता छान प्रतिसाद मिळत होते. त्याचं डोकं आता दुखत नव्हते व जखमही बरी होत आली.असंच वर्ष पार पडलं आणि मग त्याला डॉक्टरांनी दहावीच्या परिक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्याची शाळाही नीट सुरू झाली.
त्याने मनापासून अभ्यास केला आणि तो परिक्षेला बसला. त्याला ८८टक्के मार्क पडले. मग त्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स साईडला प्रवेश घेतला. त्याने छान प्रगती केली. त्याला बारावीला ८५टक्के मार्क पडले. मग त्याने कॉमर्सची डिग्री करता करता सी.ए.ची (एन्ट्रन्स) प्रवेश परिक्षा दिली. ती तो पास झाला. नंतर सी.ए. च्या पुढील परिक्षा व बी.कॉम. चीही डिग्री परीक्षा सर्व चागल्या मार्कांनी पास झाला. त्याने सी.ए.ला ८०टक्के व बी.कॉम.ला ८२टक्के मार्क पडले. नंतर त्याने बाबांच्या ओळखीच्या एका सी.ए. च्या हाताखाली अनुभवासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडी थोडी कामंही करायला सुरुवात केली.
विश्वासराव व त्यांचा मित्र यांच्या म्हणण्यानुसार त्याने ८-१० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. तिथे त्याची तिथे संगणकाची व लेखी परिक्षा चांगली होत असे. पण तोंडी परिक्षेत त्याला काही नीट उत्तरं पटकन देता आल्यामुळे त्याची निवड होत नव्हती. त्यामुळे तो थोडा नाराज झाला. नोकरीचा नाद सोडून देतो असे म्हणू लागला. पण त्याचे मित्र, आई, बाबा, शिक्षक, त्यांच्या बरोबर काम करीत असलेल्या सर्वांनी व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या बाबांच्या मित्रांनी त्याची समजूत काढली. नंतर त्याने एका कंपनीचा अर्ज भरला. तिथे संगणकाच्या व लेखी परिक्षेत चांगल्या तऱ्हेने पास झाला. आणि मग त्याला त्या कंपनीने इंटरव्ह्यूला बोलावल्यावर तो तिथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं थोडी थोडी हळूहळू दिली व काही ठिकाणी अडखळत बोलू लागला. तर त्यांना असे वाटले की तो घाबरत आहे. पण तसे नव्हते.मग तिथे एका अधिकाऱ्याला शंका आली म्हणून त्याने त्याचा बाकीचा परफॉर्मन्स पाहीला. सर्व सर्टिफिकेटस् पाहीली. तेव्हा, त्याला दहावीच्या वर्षी एक वर्ष गँप व डॉक्टरांच्या रजेच सर्टिफिकेट दिसलं. मग त्याने सर्व चौकशी केली. तेव्हा कळलं की त्याच्या बोलण्यावर ऑपरेशनचा परिणाम झाल्यामुळे तो असा बोलतो. मग त्याचा स्पेशल केस म्हणून इंटरव्ह्यूमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून द्यायला सांगितले. ती सर्व बरोबर आली. आणि त्याला ती नोकरी मिळाली. पुढे त्याने ५-६वर्षे नोकरी केली. नंतर त्याने स्वतः ची फर्म काढली. त्याला अनुरूप, छानशी सहचारिणी मिळाली. त्यांच्या सहजीवनाची बाग प्रज्ञा व अमोल या दोन फुलांनी फुलली. आणखी काय हवे! झाली पहा परिपुर्ती.
समाप्त.
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈