सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
ही मिस् जोकर अग इतकी सोन्यासारखी पोर. हो मी पोरच म्हणते माझी तिला.स्वतःच्या कुटुंबासाठी झिजली. भावाला शिकवले. परदेशी पाठवले. तो गेला तो गेलाच. लग्न केले. तिकडेच स्थायिक झाला. बहिणीचे मोठ्या घरात सालंकृत कन्यादान केले. दोघेही आपापल्या संसारात सुखी आहेत. पण आईबापांकडे बघणार कोण? आहे मिस जोकर. हक्काची सगळ्यांसाठी राबणारी तिचा विचार कोण करतो? आई आज दीड वर्ष अंथरुणात. तिचं सगळे करुन ही आपली ड्युटी हसतमुखाने करते. कधी उशीरा येणं नाही कि लवकर जाणं नाही. हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना हवीहवीशी वाटते. अर्धे अधिक पेशंट औषधापेक्षा हिच्या बोलण्यानेच सुधारतात. त्यांच्या नातेवाईकाना धीर मिळतो. मध्यंतरी दोन, तीन मानसिक रुग्ण केवळ आणि केवळ हिच्यामुळेच सुधारुन ठणठणीत होऊन घरी गेले. विनोद धमाले म्हणून एक मुलगा चांगला शिकलेला, चांगल्या हुद्यावर नोकरीला. तुमच्या भाषेत व्हेलसेटल. डिप्रेशन मध्ये होता. हिच्यामुळे सुधारुन खडखडीत बरा झाला. त्याचे आई वडील इतके खुश झाले. हिची वागणूक, चालचलन बघून हिला मागणी घातली. पण हिचे आपले ‘मला लग्न करायचं नाही. रुग्णाची सेवेतच मी आयुष्य घालवणार. हाच माझा संसार हेच माझं सुख.आता तु तरी तिला समजावून सांग.”
इतक्यात दुसरी एक नर्स धावत आली. “सिस्टर लवकर चला. चिल्डर्न वॉर्ड मधली तीन नंबर बेबी दूध, इंजेक्शन, काही घ्यायला, झोपायला तयारच नाही. तिला मिस जोकरच पाहिजे गाणे म्हणून झोपवायला. तिचा ताप पण चढतोय. चला लवकर”
“असंच आहे बघ इथे. त्या मिस जोकर शिवाय इकडे कोणाचं पान हलत नाही. अशाने तिला विश्रांती मिळत नाही. ह्याचा विचार ती स्वतः तर करत नाहीच पण हे लोक पण करत नाही.”
क्रमशः….
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
फोन नं.8425933533