श्री बिपीन कुलकर्णी

संक्षिप्त परिचय

मी , बिपीन दत्तात्रय कुळकर्णी. नुकताच ठाण्यासारख्या उद्योग, कला आणि खवैयांच्या नगरीत वास्तव्यास आलो.

ग्लोबल टेली, डी लिंक, IDBI Principal mutual fund, प्रभुदास लीलाधर ह्या सारख्या कंपन्यांमध्ये 35 वर्षे सेल्स मार्केटिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव घेतलेला.

क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम खेळांची आवड असलेला.

CKP समाजउन्नती मंडळ, मुलुंड ह्या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. समाज बांधिलकी मानणारा आणि जपणारा. कुटुंबात, मित्रमंडळीत रमणारा आणि वाचन म्हणजे आपले विचार समृद्ध करणारं  साधन ह्यावर त्रिवार विश्वास असलेला.

चारोळ्या, कविता आणि कथा सहज सुचत गेल्या… मी लिहीत गेलो..

आपणा सर्वांवर लोभ आहेच व तो आटू न देण्यासाठी ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज ह्यांच्या चरणी प्रार्थना …

☆ जीवनरंग ☆ लाल गुलाबाची भेट..भाग-2 ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆ 

कॉलेज संपलं. पुढे शिकायची इच्छा होती पण घरच्या परिस्थितीमुळे नोकरी पत्करली आणि घराला पैशाच्या रूपाने टेकू दिला. माझं रहाट  गाडगं चालू झालं आणि त्यात इतका बुडालो कीं सुमतीचं काय झालं असेल, कुठे असेल ती ? अजून पुढे शिकण्यासाठी परदेशी गेली असेल कां ? आणि मुख्य म्हणजे लग्न झालं असेल का? अनेक विचार डोक्यात येत आणि जात. काळ… हेच सगळ्या गोष्टीवरचं  एक रामबाण औषध . घरचे मागे लागले होते … लग्नाचं बघा म्हणून .. मीच काहीतरी कारणं सांगून वेळ मारून नेत होतो.

आणि अचानक एके दिवशी घरच्या पत्यावर एक कुरियर आलं. उंची गुलाबी लिफाफा … त्यात गुलाबी रंगाचा कागद .. अक्षर बघितलं आणि अंगावर शहारा आला. सुमतीच हस्ताक्षर मी ह्या जन्मात तरी विसरू शकणार नव्हतो. पत्र वाचलं… सुन्न झालो. त्या लिफाफ्यात अजून एक वस्तू होती. गडद लाल रंगाचा टपोरा गुलाब… पण आज तो गुलाब माझ्याकडे बघून हसत नव्हता. अगदी कुचेष्टेने सुद्धा…कोमेजल्या सारखा दिसत होता. गुलाब बाहेर काढताना काटा टोचला. विव्हळलो मी .. कश्यामुळे ते मात्र कळलं नाही.

परत एकदा ते पत्र वाचलं आणि शेवटची ओळ वाचताना तीन ताड उडालो… लिहिलं होतं …

अजूनही तुझीच … सुमती …

समाप्त 

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments