श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग ☆ — समन्वय — अलक ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
बागेतली रानजाई ‘एक्झोऱ्या’ ला बिलगली, तेव्हा पानोपानी खूप बहरली. तो आश्वस्त, ती बिनधास्त.त्याच्या लालभडक फुलांचे गुच्छेदार गेंद, तिच्या नाजुक, धवल, चिमुकल्या फुलांचा मंद, रोमांचक गंध. बाकीच्या वेली, सायली, जुई, मधुमालती तिच्या कडे बघून हसल्या फिदीफिदी. “कशाला घेतलास त्याचा आधार? आपण एकेकट्या आत्मनिर्भर होऊ शकतो.”
“तुम्ही तरी कसलातरी -भिंतीचा,काठीचा, गेटचा आधार घेतलाच आहे की. मी त्याचा घेतला. स्त्री मुक्ती, स्त्रीमुक्ती ऐकून कान विटले. एकमेकांचे गुणावगुण आम्ही समजून घेतले नि आमचे सूर छान जुळले.”
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈