☆ जीवनरंग ☆ पुन्हा नव्याने ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
धो धो पाऊस झाला. तुफान ढग फुटी.माणसांवर
रागावून कोसळला. सगळीकडं पाणीच पाणी! उंच आकाशनिंबावरचं त्यांचं घरटं होतं की नव्हतं झालं. घरट्यातील अंडी खाली पडून फुटून गेली. दोघंही फांदीवर बसून एकमेकांची समजूत घालत असावेत. जड मनानं मी बाल्कनीच दार बंद केलं.सकाळी जाग आली ती ओळखीच्या किलबिलाटानं. बाल्कनीत येऊन पाहिलं.
चिमणा-चिमणी गवत, काड्या गोळा करून घरटं बांधताना दिसले. पुन्हा नव्या उमेदीचं चिमणगाणं गुणगुणत!!सर्वस्व वाहून गेलं तरी दु:ख विसरून!!!नव्यानं संसार सजवण्यासाठी!!!!
© सौ. दीपा नारायण पुजारी
फोन.नं ९६६५६६९१४८
email :[email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈