सुश्री गायत्री हेर्लेकर
जीवनरंग
☆ अश्रूंची फुले ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
बरेच दिवसांनी पुजा करायला ती बसली. परडीतुन दुर्वा-लाल फुल गणपतीला, बेल-पांढरे फुल महादेवाला, तुळस -पिवळे फुल विष्णुला वाहिले.
“ओम् विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु:”
शब्द कानात घुमायला लागले.
रोज पुजा करतांना विष्णुसहस्त्रनाम म्हणायची सवय होती त्याची. तिच्या डोळ्यातुन टचकन पाणी आले.
ही..ही अश्रूंची फुले कोणाला?
नकळत परडी खाली ठेवली.
हुंदका बाहेर पडु नये म्हणुन एक हात तोंडाकडे, अन् दुसरा हात गेला — अलिकडेच मोकळ्या झालेल्या गळ्याकडे—नसलेले मंगळसुत्र चाचपडायला.
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर अभिव्यक्ति