श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ जुगार…. (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
‘गावातील सद्दीलाल नावच्या व्यक्तीने आत्महत्या केली.’ वर्तमानपत्रात बातमी छापली होती. अनेक तर्हेलने चौकशी सुरू झाली. पत्रकारांची टीम सद्दीलालच्या घरी पोचली. त्यापाकी एकाने सद्दीलालच्या बायकोला विचारले,
‘सद्दीलाल काय करत होते?’
‘जुगार खेळत होते.’
काय? त्याला जुगार खेळण्याचं व्यसन होतं?’
‘होय! जुगारात हरत होते, तरीही पुन्हा पुन्हा जुगार खेळणं सोडत नव्हते.’
‘जुगारात हरल्यावर पैसे कुठून आणत होते?’
‘प्रथम माझे दागिने विकले. मग माझ्या घरातली भांडी-कुंडी गेली. मग जमीन गहाण ठेवून बॅँकेतून कर्ज घेतलं…. मग कृषी सोसायटीतून … मग सवकाराकडून…. जिथून जिथून कर्ज मिळणं शक्य होतं, तिथून तिथून त्यांनी कर्ज घेऊन त्यांनी ते पैसे डावावर लावले.’
‘जुगारात ते नेहमीच हरत होते की कधीमधी जिंकतही होते?’
दोन-चार वर्षात कधी तरी एखादी छोटीशी रक्कम जिंकतही होते.’
दोन-चार वर्षात?
‘होय. कधी गव्हाचा पीक चांगलं यायचं तर कधी कापसाचं.कधी ज्वारी किंवा डाळ, कधी आणखी काही…’त्यामुळे आशा वाटायची. उमेद वाढायची. वाटायचं, एखादं तरी वर्षं असं येईल की घातलेलं सगळं वसूल होईल. पण असं कधी झालं नाही. याच कारणासाठी ….’
‘म्हणजे सद्दीलाल शेती करत होता?…. शेतकरी होता?
‘शेतकरी… शेती हे शब्द आता जुने झालेत साहेब….आता आम्ही याला जुगार म्हणतो. खूप मोठा जुगार…. प्रत्येक वर्षी हजारो रुपयाचं बियाणं खरेदी करायचं, पिकाच्या उमेदीत हजारो रुपयाचं खत मातीच्या हवाली करायचं। झुडपांवर हजारो रुपयांचं औषध मारायचं., पाणी देण्यासाठी हजारो रुपये खर्च करायचे. ढोर मेहनत करायची. अचानक आलेल्या एखाद्या विपत्तीमुळे उभं पीक नष्ट होणं … कधी पीक आलंच तर त्याचे भाव आम्ही नाही, दुसर्यावच कुणी तरी निश्चित करणं… त्यांची मर्जीने… हे सगळं जुगार नाही तर काय आहे?’
पत्रकाराची जीभ टाळूला चिकटली.
मूळ हिंदी कथा – ‘जुआ’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈