सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ प्रतिकृती… – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)
काय बरे करावे? सुखदा ला काही म्हणजे काही सुचेनासे झाले. आज तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. दुपार झाली तरी स्वतःचा टिफिन ही तिने खाल्ला नाही. रोजच्याप्रमाणे घरी फोन सुद्धा केला नाही.
डायरेक्ट सुहासला विचारावे का? मनाला तरी पटते का ते ‘? काय विचारणार? इतक्या वर्षांचा सहवास इतका तकलादू का आहे? कसे जमायचे आहे? ऑन एवढा कसा सुहास सारखा? नेमका इथेच कसा आला? याचा ट्रेस कसा लावायचा? सुख दाला काही समजेना.
शांतपणे विचार करायला लागल्यावर तिला हळूहळू एक मार्ग दिसायला लागला. तू विचार अतिशय संयमाने आणि आपल्या ऑफिसच्या वजनाचा वापर करून ऑफिसला विश्वासात घेऊन, मदत घेऊन कसा सोडवायचा हे तिला सुचायला लागले. अगदी त्याच प्रोसिजरने तिने जायचे ठरवले.
उगाच आकांडतांडव करून, त्रास करून घेऊन किंवा भलतेसलते विचार करून हा प्रश्न निश्चितच सुटणार नव्हता. मनाशीठाम निर्णय करून सुखदा उठली. गार पाण्याने तोंड धुतले आणि ती फाईल घेऊन आपल्या सिनिअर ऑफिसर यांच्या केबिनकडे निघाली.
तिला येताना पाहताच दारातला शिपाई पुढे आला आणि हातातली फाईल घेऊन म्हणाला, “मॅडम आपण का आला? मला बोलवायचे ना!” ” अरे नुसती फाईल द्यायची नाही. आपल्या साहेबांची काही गोष्टी बोलायच्या आहेत. “त्यांनी साहेबांच्या केबिनचे दार उघडले. सुखदा साहेबांसमोर आली, ” का मॅडम काही विशेष काम? या बसा. “
साहेबांच्या टेबलासमोर च्या गुबगुबीत खुर्चीत बसत सुखदानेआपले काम, प्रॉब्लेम सांगायला सुरूवात केली, ” सर, आजच्या उमेदवारांमधून या जॉन राईट ला सिलेक्ट करावे असे मला वाटते. पण सर, प्रॉब्लेम आहे एक. याचे नाव जॉन राईट. याच्या आई ची पूर्ण माहिती मिळाली. पण वडिलांचा रिकामाच आहे. त्याची आई ही माहिती द्यायला तयार नाही मी प्रयत्न केला. सर, आपल्या इन्स्टिट्यूट मधला रिसर्च इतका महत्त्वाचा आहे. कुठेही जराही होता कामा नये. आपल्या देशाच्या दृष्टीने ही हे घातक आहे. याचे वडील कोण? कुठले? याचा त्यांच्याशी किती संबंध आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या कामात काही अडथळे निर्माण करणार नाही ना, एवढे पाहिले पाहिजे. म्हणून मी आपली परवानगी मागायला आले. “
सुखदाने आपल्या कामाचा इतका सखोल विचार केल्यास पाहून त्यांना कौतुक वाटले. “ठीक आहे. त्यासाठी काय करायला हवे असे वाटते तुम्हाला? काही मदत हवी आहे का? ” “हो सर, त्याच्या बर्थ सर्टिफिकेट वरून आपण त्याचा जन्म कुठे झाला ते ड्रेस करू शकतोआणि त्या हॉस्पिटल मधून आईवडिलांची नावे माहिती मिळवू शकतो. ऑफिस च्या परवानगीने चौकशी करता आली तर पटकन माहिती मिळेल. तेवढी परवानगी हवी आहे सर. ” “ठीक आहे तुम्ही करू शकता. “” थँक्यू सर, येऊ मी? ” म्हणत सुखदा उठली.
तिच्या मनावरचे ओझे एकदम उतरल्यासारखे झाले. केबिनमध्ये घेऊन प्रथम ये घरी फोन मला घरी यायला उशीर होईल, कदाचित रात्रही होईल असे सांगितले. लगेच कॉम्प्यूटर पुढे येणे कामाला लागली. इंटरनेटवर पांडेचरी हॉस्पिटल ची फाईल तिने वाचायला सुरुवात केली. एक खूप जुने मोठे हॉस्पिटल होते ते. बऱ्याच वर्षापासून रिसर्च सुरु आहे. आपल्याकडे मुंबई बेंगलोर हैदराबादला ज्या ब्रांचेस आत्ता सुरू होत आहेत त्या िथे बर्याच आधीपासून सुरू आहेत. त्या वेगवेगळ्या ब्रांचेस वाचता वाचता”जेनेटिक इंजीनियरिंग” इकडे तिचे लक्ष गेले. त्या ब्रँच मध ले सगळे रिसर्च पेपर्स शोधायला तिने सुरवात केली. टिश्यू कल्चर, टोटीपोटेन्सी, कॅलस, हॉर्मोनाल ट्रीटमेंट. अरे बापरे! किती पुढे गेले हे क्षेत्र! त्यामानानं आपण किती मागे आहोत अजून. सुखदा च्या मनात येऊन गेले.
क्रमशः…
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈